Sanjay Raut : लाडक्या बहिणींना 1500 देऊन विकत घेताय का ? राऊत भडकले, लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवकपद देण्यावरून भाजपवर हल्लाबोल

बदलापूरच्या शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवकपद दिलं आहे. त्यावरून संजय राऊतांनी भाजपावर हल्ला चढवला असून एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे असा व्यभिचार करायचा, त्यांना विकत घेत आहात का अशी शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं.