शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. शिंदे यांचा गट ही 'एसंशि गट' असून, शहांची 'तोडा, फोडा आणि राज्य करा' ही नीती असल्याचा आरोप त्यांनी केला. फडणवीस सत्तेचा गैरवापर करत बिनविरोध निवडणुका घेत असून, त्यांना आपल्या टीकेने 'मिरचीची धुरी' लागल्याचा चिमटाही ठाकरेंनी काढला.