…हे तर किळसवाणं, बदलापूर अत्याचारातील सहआरोपी नगरसेवक! संजय शिरसाटांचा पारा चढला

कुळगाव बदलापुरातील भाजपचे स्वीकृत नगरसेवक म्हणून तुषार आपटे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र अक्षय शिंदे लैंगिक प्रकरणातील तुषार आपटे हे सहआरोपी आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एक नवीन वाद सुरु झाला आहे. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.