WPL 2026: हरमनप्रीत कौरच्या मागे हात धुवून पडली ही खेळाडू, 3 महिन्यात दुसऱ्यांदा विजयाचा घास हिसकावला
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 3 गडी राखून पराभव केला. खरं तर हा सामना मुंबईच्या पारड्यात झुकलेला होता. पण शेवटच्या काही षटकात या सामन्याचं चित्र आरसीबीच्या फलंदाजाने बदललं.