पिंपरी येथील सभेत महेश लांडगेंनी अजित पवारांविरोधात देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली. युतीमध्ये केवळ भाजपनेच इतरांचा सन्मान करायचा का, असा प्रश्न लांडगेंनी उपस्थित केला. निवडणूक जवळ आल्याने अनेकांना वाचा फुटते, असे म्हणत फडणवीसांनीही अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर टीका केली.