Gulabrao Patil : जिसे लढना ना मालूम वह तीर तलवार क्या जाने…गुलाबराव पाटलांनी सभा गाजवली

गुलाबराव पाटील यांनी अहिल्यानगर येथील सभेला संबोधित करत एकनाथ शिंदे सरकारच्या महिला कल्याणकारी योजना आणि विकास कामांवर प्रकाश टाकला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत पाटील यांनी शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका आणि सामान्य माणसासाठी कटिबद्धता अधोरेखित केली.