एका बाजूला ठाकरेंची तोफ, तर दुसरीकडे महायुतीचा मास्टरस्ट्रोक, आज प्रचाराचा शेवटचा सुपरसंडे, पाहा कोणाची कुठे सभा?
महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा रविवार असून मुंबईतील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक संयुक्त सभा पार पडणार आहे. दुसरीकडे महायुती आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे.