लैंगिक अत्याचार आरोप असलेल्यांना स्वीकृत नगरसेवक करता? राऊतांचा भाजपवर हल्ला

लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या तुषार आपटे यांच्या स्वीकृत नगरसेवक पदावरील नियुक्तीवरून महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत तीव्र पडसाद उमटले. जनतेच्या संतापाची लाट पाहून आपटे यांना राजीनामा द्यावा लागला. या घटनेवर संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करत जनतेला मूर्ख समजू नये, असा इशारा दिला.