मुंबईतील लालबागचा गड हलला, ठाकरेंच्या ज्येष्ठ शिलेदाराचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, म्हणाला 59 वर्ष एका घरात राहिलो पण..

ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते दगडू दादा सकपाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ५९ वर्षांची सोबत सोडताना भावूक झालेल्या सकपाळ यांच्या या निर्णयामुळे लालबाग-परळमध्ये शिवसेना शिंदे गट अधिक मजबूत झाला आहे.