मकर संक्रांतीचा सण राज्यभर उत्साहात साजरा होत आहे. तिळगुळ वाटून 'गोड बोला'चा संदेश दिला जात आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. दुसरीकडे, तुळजाभवानी मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त ओवाळणीसाठी येणाऱ्या महिलांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवेशाचे नियम बदलले आहेत.