Makar Sankranti 2026 : कुठे पोंगल, तर कुठे लोहरी.. मकरसंक्रातीची विविध नावे काय? देशातील विविध भागात कशी साजरी होते संक्रांत ?

मकरसंक्रांत भारतात वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांनी साजरी केली जाते. उत्तर भारतात हा सण मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो आणि खिचडीचे दान व सेवन केले जाते. पंजाब व हरियाणामध्ये संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोहडी साजरी होते, तर गुजरात व राजस्थानमध्ये पतंगोत्सव प्रसिद्ध आहे. तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून चार दिवस साजरा केला जातो. आसाममध्ये भोगाली बिहू, कर्नाटक व आंध्र प्रदेशात संक्रांती तर पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती म्हणून ओळख आहे. विविधतेतून एकतेचे दर्शन या सणातून घडते.