हार्बर मार्गावरील प्रवाशांना मिळणार मोठं गिफ्ट ! प्रजासत्ताक दिनापासून ‘गारेगार’ प्रवास

मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांची एसी लोकलची प्रतीक्षा अखेर संपली आहे. २६ जानेवारी २०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल मार्गावर पहिली एसी लोकल धावणार आहे. दररोज १४ फेऱ्यांद्वारे प्रवाशांना 'गारेगार' आणि सुखकर प्रवास अनुभवता येईल. यामुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.