अण्णा मलाईंच्या वक्तव्यानंतर लुंगी वाद पेटला

भाजप नेते अण्णा मलाई यांच्या मुंबई महाराष्ट्राची नाही या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुंबईत लुंगीचा वाद सुरू झाला आहे. रवींद्र चव्हाण पायाला इजा झाल्याने लुंगी नेसून सभेत आल्यावर संजय राऊतांनी त्यावर टीका केली. चव्हाणांनी याला वैयक्तिक बाब म्हणत प्रत्युत्तर दिले. हा वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.