महाराष्ट्र पालिका निवडणुकीपूर्वी बोगस आणि दुबार मतदारांवरून राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे बंधूंनी अशा मतदारांना मतदान केंद्रावरच ठोकण्याचा इशारा दिला असून, संजय राऊत यांनी सकाळी ७ वाजल्यापासून सक्रिय होणारे विशेष पथक तयार केल्याचे सांगितले. भाजपने याला राजकीय नौटंकी म्हणत, मतदार यादी सुधारणा कार्यक्रमाला ठाकरे गटाचा विरोध असल्याचा आरोप केला.