नाशिक जिल्ह्यातील येवला येथे अहमदाबादच्या धर्तीवर तीन दिवसीय भव्य पतंग उत्सव साजरा होतो. भोगी, मकर संक्रांती आणि करी या दिवशी महिला वर्ग छतांवरून पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद घेतात. डीजेच्या तालावर नाचत, फटाक्यांची आतषबाजी करत हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो.