Maharashtra Election 2026 : 500-500 रूपयांच्या नोटाच नोटा… पैशांची बॅग सापडली, खारघरमध्ये एकच गदारोळ

नवी मुंबईतील खारघर सेक्टर 20 मध्ये मतदारांना वाटण्यासाठी आणल्याचा संशय असलेली पैशांनी भरलेली बॅग सापडली. यश अभि न्यूज सोसायटीमधून 2 लाख 13 हजार रुपये जप्त करण्यात आले असून, खारघर पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे. हे पैसे कोणत्या पक्षाचे होते, याचा तपास सध्या सुरू आहे. या घटनेने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.