परभणी येथे पैसे वाटपाच्या आरोपांदरम्यान, अतुल सावे यांचे दिवंगत वडील मोरेश्वरजी दिनानाथ सावे यांचे नाव अद्यापही मतदार यादीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियमानुसार हे नाव वगळणे आवश्यक असतानाही ते कायम आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.