मुंबईतील धारावी, वॉर्ड क्रमांक १८४ मध्ये मतदान प्रक्रियेत मशाल चिन्हाचे बटण दाबत नसल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत नकाशे यांनी केला आहे. काही मतदारांनी मतदान करताना विलंब झाल्याचे आणि तांत्रिक अडचणी आल्याचे सांगितले. यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मत मिळाले की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.