Maharashtra Election Results 2026 : मतमोजणीला सुरुवात, काही क्षणात हाती कल येणार

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६ साठी मतमोजणी सुरू झाली आहे. पोस्टल मतमोजणीनंतर ईव्हीएमद्वारे मतांची मोजणी होत आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांसह इतर ठिकाणीही राजकीय भवितव्य स्पष्ट होणार आहे. काही क्षणातच पहिला कल हाती येणार आहे.