मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने शतक गाठत सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यांना आता केवळ 6 जागांची गरज आहे. दुसरीकडे, 20 वर्षांनी एकत्र आलेल्या ठाकरे-राज बंधूंच्या युतीला ६४ जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे युतीची सत्ता येण्याचे चित्र स्पष्ट झाले असून, महापालिकेच्या राजकारणात नवे समीकरण उदयास आले आहे.