पुण्यात वानवडी साळुंके प्रभागातून काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अवघ्या तीन दिवसांत पक्ष बदलून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतरही जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल जगताप यांनी आभार मानले. हा विजय शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेला समर्पित करत, काँग्रेस मजबूत करण्याची त्यांची प्राथमिकता असेल असे त्यांनी सांगितले.