महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. २९ पैकी २६ महापालिकांमध्ये भाजप आघाडीवर असून, यात पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि वसई-विरारचा समावेश आहे. मुंबईत भाजप-शिंदे युतीने १७६ पैकी ९२ जागांवर आघाडी घेतली आहे, तर ठाकरे गटाला ६७ जागा मिळाल्या आहेत.