पुणे महानगरपालिकेतून अजित पवार यांचे घड्याळ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अलार्मऐवजी पुणेकरांनी अजित पवारांच्या घड्याळाचे बारा वाजवल्याची चर्चा सुरू आहे. अजित दादांच्या मोफत योजनांचा पाऊस पुणेकरांनी साफ नाकारल्याचे निकालांमधून दिसून येत आहे.