BBL: डेव्हिड वॉर्नरने विराट कोहलीचा विक्रम मोडला, कसा काय ते जाणून घ्या
बिग बॅश लीग स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरने आक्रमक खेळी करत शतक ठोकलं. पण त्याचं शतक संघाच्या कामी आलं नाही. कारण सिडनी सिक्सर्सने हा सामना जिंकला. पण डेव्हिड वॉर्नरने विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला.