Latur Nagar Nigam Result : राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र असं असलं तरी तीन जागी मात्र त्यांची विजयी घोडदौड रोखली आहे, ती देखील काँग्रेसने. तीन महापलिकांत विजय मिळवत पक्षात अद्याप धुगधुगी कायम असल्याचे काँग्रेसने दाखवले आहे. तीन ठिकाणच्या विजयानंतरही सर्वात जास्त चर्चा होत्ये ती लातूरची... तिथे काँग्रेसचा दबदबा अद्यापही कायम आहे.