Sharad Pawar-Ajit Pawar: शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊनही काहीच करू शकले नाही, पवार कुटुंबाचं भविष्य काय असेल?

Sharad Pawar-Ajit Pawar: या महापालिकेत ठाकरे ब्रँडच्या पराभवापेक्षा ठळक चर्चा झाली ती पवारांची पॉवर कमी झाल्याची. पुतण्याचे उगवतीचे नेतृत्व आणि काकांचे मावळते नेतृत्वाचे रंग पुसत चालल्याची चिंतेने पुण्यातील राष्ट्रवादीच्या आकाशात काळोख झाला आहे. या पराभवाचे चिंतन होईलच. पण राष्ट्रवादीची दिशा काय असेल, या दोन शकलं असलेल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी राजकीय भूकंप होईल का? याची चर्चा सध्या रंगली आहे.