BMC Election Result : AIMIM ते शिवसेनेपर्यंत… BMC निवडणुकीत किती मुस्लिम उमेदवार विजयी ?

मुंबई महानगरपालिका निकालात भाजप-सेना युती सत्ता स्थापन करणार असली तरी, यंदा अनेक मुस्लिम उमेदवारांनी विजय मिळवला आहे. यात अपक्ष आणि विविध पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. विशेषतः, असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM ने मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये लक्षणीय यश मिळवत, 100 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि मालेगावमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरून AIMIM राज्याच्या राजकारणात एक मजबूत दावेदार म्हणून उदयास आले आहे.