हिवाळ्यात गुलाबी ओठांसाठी घरच्या घरी बनवा हेल्दी आणि हर्बल लिप बाम…..

केसर लिप बाम लावल्याने ओठांना नैसर्गिक पोषण आणि ओलावा मिळतो. केसरमध्ये अँटिऑक्सिडंट्स व औषधी गुणधर्म असल्यामुळे ओठ कोरडे, फाटलेले किंवा काळवंडलेले असतील तर ते बरे होण्यास मदत होते. हा लिप बाम ओठांना खोलवर मॉइश्चरायझ करतो व थंडी, ऊन आणि कोरड्या हवामानापासून संरक्षण देतो. केसर लिप बाम नियमित वापरल्यास ओठ मऊ, गुलाबी आणि निरोगी दिसतात. तसेच तो ओठांवरील काळेपणा कमी करून नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतो आणि ओठांची त्वचा नाजूक व कोमल ठेवतो.