महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागलं होतं. मुंबईमध्ये देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलं नाही, त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी या निकालावर पहिली पत्रकार परिषद घेत, प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.