महायुतीच्या विजयात आमचाही वाटा… शेजारीच खुर्ची टाका…निकालानंतर शिंदेसेनेची बार्गेनिंग, थेट या पदावर दावा

Shinde Shivsena-BJP : कोणत्याही निवडणूक निकालानंतर खरा निकाल लागतो असं म्हणतात. महापालिका निकालानंतर आता बार्गेनिंगची खरी ताकद दिसेल. तर मित्राचे खरे रंगही दिसतील. आता विविध पदं पदरात पाडून घेताना रुसवे फुगव्याचं राजकारण विविध महापालिकेत दिसू शकते. आता या महापालिकेत शिंदे सेनेने या पदावर दावा ठोकला आहे.