भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे मुंबईत निधन झाले आहे. मुंबादेवी मतदारसंघाचे पाच वेळा आमदार राहिलेल्या पुरोहित यांनी काल रात्री बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.