Manoj Jarange on BJP : महापालिका निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचा झंझावात दिसला. कोल्हापूर, चंद्रपूर, लातूरची गढी वगळता इतर ठिकाणी भाजपने मोठे यश मिळवले. यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली. मुस्लिम,अनुसूचीत जाती, मराठे एकत्र आले तर काय होते हे समोर आल्याचा दावा त्यांनी केला, त्याचवेळी त्यांनी या पक्षांना मोठा इशारा दिला. त्यामुळे या पक्षांची धाकधूक वाढली आहे.