भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. राज पुरोहित यांनी अखेरचा श्वास घेतला असून, त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व हरपले.