Rohit Pawar: बड्या कंपन्यांची आपल्याकडं गुंतवणूक का नाही? फडणवीस दावोस दौऱ्यावर असतानाच रोहित पवारांचा खोचक टोला

Rohit Pawar Remark on Investment: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकाऱ्यांसोबत दावोस दौऱ्यावर आहेत. पाच दिवस ते दावोस दौऱ्यावर असतील. पण त्यापूर्वी रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून अचूक निशाणा साधला आहे. त्यांनी सध्याच्या औद्योगिक घडामोडींवरुन खोचक टोला हाणला आहे.