राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भाजपने आघाडी घेतली आहे. महायुतीत असूनही शिंदे गटाच्या शिवसेनेला फारसे यश मिळाले नाही. मुंबईतही ठाकरे गटाने शिंदे गटाला मात दिली. या सुमार कामगिरीमुळे एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असून, लवकरच अकार्यक्षम मंत्र्यांना पदावरून हटवून पक्षबांधणीची जबाबदारी देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.