Sanjay Raut | ज्या दिवशी भाजपचा महापौर होईल, त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल; संजय राऊत यांचा हल्लाबोल

कोणत्याही स्थितीत शिंदेंचा महापौर होणार नाही. मुंबईत कोणाला बसवायचं हे दिल्लीत ठरलंय, अजून ठाकरेंच्या शिवसेनेने काही ठरवलं नाही, मी मजा बघतोय, असं राऊत म्हणाले. भाजपचा महापौर होऊ नये म्हणून सहकारी पक्ष देव पाण्यात ठेऊन बसलेत. भाजपचा महापौर ज्या दिवशी होईल त्यादिवशी मुंबई शोकसागरात बुडेल.