Sanjay Raut and Dada Bhuse | संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला; मैत्रीचे नाते कायम

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर 178 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरुन दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. आज या खटल्याच्या सुनावणीसाठी दोन्ही नेते मालेगाव कोर्टात हजर होते. या वेळी संजय राऊत यांनी खटला मागे घेतल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.