पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणातून काही प्रमाणात अलिप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विलीनीकरणानंतर ते सक्रिय राजकारणापेक्षा सामाजिक कामांमध्ये अधिक लक्ष घालणार असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे, असा आग्रह अजित पवार यांनी धरला होता.