Sharad Pawar Health Update | शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनीच केला मोठा खुलासा, म्हणाले….

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत पुन्हा थोडी बिघडली आहे. त्यांना उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, पुढील दोन दिवस ते रुग्णालयात राहतील. त्यांना उलट्या होत होत्या, त्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) झाली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.