राष्ट्रवादी विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा शांत असला तरी, सुनील तटकरेंना याबद्दल पूर्वकल्पना होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १६ जानेवारीच्या बैठकीत अजित पवार, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. या बैठकीत तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली गेल्याचा दावा आहे. तटकरेंनी मात्र ही माहिती नाकारली असून, सुप्रिया सुळेंनीही भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.