मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर, पश्चिम या तिन्ही मार्गांवर आज सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती आणि देखभालीची अभियांत्रिकी कामे यासाठी हा ब्लॉक असून, यामुळे भविष्यात रेल्वेचे वेळापत्रक अधिक नियमित होण्यास मदत होईल. प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासावे असे आवाहन करण्यात आले आहे.