मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. आयुक्त भूषण गगराणी स्थायी समिती अध्यक्षांकडे हा अर्थसंकल्प सादर करतील. प्रशासकाच्या परंपरेनुसार वाढीव अर्थसंकल्प अपेक्षित आहे का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यंदाचा अर्थसंकल्प तुटीचा असणार की त्यात वाढ होणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.