काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ” हा स्लोगन घेऊन सत्ता मिळाली होती, पण आज महाराष्ट्र कुठे आहे? शेतकरी, बेरोजगारी आणि गुंतवणूक या सगळ्या बाबतीत राज्य मागे आहे. फक्त घोषणाच होतात आणि लोकांची फसवणूक केली जाते. ड्रग्सच्या प्रकरणात महाराष्ट्राला जगभर चर्चा मिळाली आहे.