संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील शंभर टक्के मंत्री भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असल्याचा गंभीर आरोप केला. फडणवीस मंत्र्यांना क्लीनचिट देऊन त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवतात, असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन चालवणे लोकशाहीची विटंबना असून, हे दुर्योधनाच्या अहंकारासारखे असल्याचे राऊत यांनी नमूद केले.