महाराष्ट्र राज्य विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबई येथे सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सभागृहाला संबोधित करत राज्याच्या विकासाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यपालांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यावर भर दिला.