कांदा आणि मक्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे कांदा व मका उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणापूर्वी शेतकऱ्यांनी बाजार समिती परिसरात एकत्र येत मोठे आंदोलन उभारण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र जमले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.