फाईल हलते पैशाने, मंत्रालय चालते हफ्त्याने….; विरोधक आक्रमक, नरहरी झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी

मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणामुळे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरत आहे; मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरणी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने करत राजीनाम्याची मागणी केली आहे.