महाराष्ट्राच्या राजकारणात विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे, असे सांगितले जाते; मात्र सध्या तो विचारांचा संवाद कुठेतरी थांबल्याचे दिसत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, “जेव्हा आपण विचारांच्या लढाईची गोष्ट करतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीकडेही ठोस विचार असणे आवश्यक आहे.