महाराष्ट्र विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून तीव्र आंदोलन केले. नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत, भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. फाईल हलते पैशाने, मंत्रालय चालते हप्त्याने अशा घोषणा देत विरोधकांनी भ्रष्टाचाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.