पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २६ तारखेला वरळी डोममध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.